
यवतमाळ , दि. ८ – एका महिलेने नवजात अर्भकाला प्लास्टीकच्या पिशवीत टाकून फेकुन दिलयाची घटना नेताजी चौकात उघडकीस आली. दाम्पत्याच्या सतर्कतेने अर्भकाचे प्राण वाचले.
अनैतिक संबंध उघडकीस येईल या भीतीपोटी एका महिलेने दोन दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक नाल्यात टाकून पलायन केले. एका प्लास्टीक पिशवीच्या भोवती दोन-तीन कुत्रे घुटमळत होते. त्या पिशवीतून हात बाहेर आल्याचे रस्त्याने जाणाºया दाम्पत्याच्या निदर्शास आले. हा प्रकार बघून महिलेचा पती व परीसरातील नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली. प्लास्टीकच्या पिशवीभोवती चिखल उडलेला होता. अन्नाचे शितोडे पिशवीत शिरले होते. एका युवकाने लगेच समोर जावून नवजात शिशूला पिशवीतून बाहेर काढले व थेट शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वेळ न दवडता त्या अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. काही युवकांनी अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी लगेच अर्भकाला स्वच्छ करून उपचार केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अर्भकाला फेकुन देणाºया महिलेवर गुन्हा दाखल केला.









