महिलेवर सामूहिक शारीरिक अत्याचार

5486_gangrape-58_copy
यवतमाळ , दि. १२ (प्रतिनिधी) -बसच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेला नियोजित स्थळी सोडून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक शारीरिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी अशोक निळ (२८) व गोपाल सुक्ते (३८) या दोघांना अटक केली आहे.
काल रात्री ९ वाजता दरम्यान घाटंजी बसस्थानकावरून यवतमाळ जाण्यासाठी एक विवाहित महिला बसच्या प्रतिक्षेत उभी होती. महिला एकटी असल्याची संधी साधून ओमनी एमएच २२ एच २८८१ हे वाहन येऊन उभे राहिले. यवतमाळला जायचे आहे का अशी विचारणा करून वाहनात बसविले. त्यानंतर वाहन खापरीमार्गे यवतमाळला जायला निघाले असता रस्त्यातील कानोजा टेकडी जवळ सदर वाहन थांबवून त्या महिलेस धाक दाखवून वाहन चालक अशोक निळ (२८) व गोपाल सुक्ते (३८) या दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर सदर वाहन यवतमाळ येथे नेऊन तेथेही त्या महिलेवर रात्रभर आळीपाळीने अत्याचार केला. पीडित महिलेला सकाळी यवतमाळ येथील बस स्थानकावर नेऊन सोडून दिले. नंतर सदर महिलेने घाटंजी गाठून घडलेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा नोंद करून अशोक निळ व गोपाल सुक्ते यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत  ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 8 = twenty four