माझी फसवणूक झाली – हजारे

Anna Hazare with Mamata Banerjee
नवी दिल्ली – ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केेले.
लोकसभा निवडणुकीसाठी आपण कोणत्याच पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना १७ मुद्दे पाठवले होते. सत्तेत आल्यानंतर आम्ही सांगितलेल्या १७ गोष्टींची अमलबजावणी करण्याचे आश्वासन बॅनर्जींनी दिले होते. तसेच देशात स्थिर सरकार यावे यासाठी बॅनर्जींना पाठिंबा द्यायचे ठरवले होते. मात्र फसवणूक होत असल्याचे दिसल्यामुळे अण्णांनी अखेर पाठिंबा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले.जेव्हा मी सभेसाठी दिल्लीत पोहोचलो तेव्हा दुपारचे १२ वाजून गेले तरी दोन हजार ते अडीच हजार लोकच तेथे उपस्थित होते. माझेही आंदोलन याच रामलीला मैदानावर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणातील जनसमुदायाने मला पाठिंबा दिला. मात्र बुधवारच्या सभेत चार हजार लोकही उपस्थित नव्हते. या सभेसाठी माझी दिशाभूल करण्यात आली. बॅनर्जी यांच्या सभेसाठी या असे निमंत्रण मला देण्यात आले तर ममता यांना अण्णा हजारे यांच्या सभेसाठी येण्यास सांगण्यात आले. ही तर संपू्र्णपणे फसवणूक आहे, असे अण्णा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × four =