मारहाण करून पोलीसाला लुटले

पुसद – घराकडे पायी जाणाºया पोलिसावर लोखंडी रॉडने मारहाण करून लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर परिसरातील राममंदिरासमोर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुभाष मोतीराम राठोड (४८) रा. गोविंद नगर हे पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात नायक पोलीस शिपायी म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता ते घराकडे पायी जात होते. अशातच श्रीरामपूर येथील राममंदिरासमोर राठोड याना तीन जणांनी अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून हल्ला चढविला. त्यांच्या खिशातील मोबाईल, गळ््यातील १० ग्रॅमची चैन असा एकुण २० हजार रुपयाचा ऐवज हिस्कावून तेथून पोबारा केला. या परिसरातील पोलीस चौकी नेहमीच बंद राहत असून त्याच्या दुर्लक्षीत धोरणाचा आज पोलीसालाच फटका बसला आहे.  यापूर्वी परिसरात चोरी व लुटामारीच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = twelve