मालकासोबत इमानदारी; रस्त्यात मात्र चोरी!

टायरचोरीचे कनेक्शन मद्रास, हैद्राबादमध्ये ; २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
यवतमाळ  – महाराष्टÑासह इतर राज्यातून टायर चोरून मध्यप्रदेशात नेणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर  येथे जेरबंद केले. यातील तीन आरोपी चालक असून मालकाने दिलेला माल इमानदारीने नियोजित ठिकाणी पोहोचवित होते. मात्र परतीच्या प्रवासामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चाके व इतर साहित्य चोरी करीत असल्याची कबुली दिली. मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यांतही या टोळीचे नेटवर्क असून, आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करून २१ जुलैपर्यंत पोलीस कोेठडी मिळविली.
तीन महिन्यांपूर्वी लाडखेड येथील बसस्थानकासमोर उभ्या अससेल्या कन्टेनरची १५ चाके चोरट्यांनी चोरून नेले होते. सदर चोरी या टोळीने केली असावी, या संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घनश्याम गाझी जाटम रा. डोंगरपुरा जि. बाझापूर, अरारफ खान वहित खान रा. मोना जि. ग्वालीयर, अनिस खान रसूल खान रा. मगेरा जि. शिप्रा, इस्ताप रशिल खान रा. मोना जि. ग्वालीयर (मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहे. त्यापैकी तीन जण ग्वालीयार येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत होते. दोन दिवसांपूर्वी आर्णी व अन्य भागातून चार चाकी वाहनाचे टायर चोरून नेत असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून  एम एच ०६/ २१६२ क्रमांकाचा ट्रक व १३ टायर जप्त केले. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. या आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपीपैकी तीन जण ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत असून दोन जण हेल्पर म्हणून काम करत असल्याचे उघड तपासात निष्पन्न झाले.  ग्वालीयर येथून ट्रान्सपोर्ट कंपनीमधून साहित्य घेऊन ते मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यात जातात. इमानदारीने नियोजीत ठिकाणी सर्व माल पोहचवून परतीच्या प्रवासात येताना ते चोरी करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. महामार्गावर थांबून असलेले अपघातग्रस्त वाहनासह अन्य ट्रक, कारचे चक्के, बॅटºया डिजल आदि साहित्य  चोरी करण्याचा गोरखधंदा ते करीत होते. यामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येऊन आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश तोगडवार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − = 0