मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह याचा राजीनामा
मुंबई- मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह याचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. नव्या आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत हेंमत नगराळे यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.
सिंह हे पुढील वर्षी निवृत्त होणार होते. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे.१९८०च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सिंह यांनी गुरुवारी राज्य गृह मंत्रालयाकडे राजीनामा सोपवला. तेथून सिंह यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.सिंह हे मुंबई किंवा त्यांचे मूळ राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सिंह यांना भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.









