मुंबईत सात मजली इमारत कोसळली

vakola-building-collapse
मुंबई – सांताक्रूझ पूर्वेला वाकोला यशवंतनगरमधील शंकरलोक ही सात मजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सुधा श्रीधरन या ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस, अग्निशमन दल आणि पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरु आहे. या इमारतीचा काही भाग शेजारच्या झोपडयांवरही कोसळला आहे. त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगा-याखाली अजून चार ते पाच जण अडकल्याची भिती आहे. रोहिणी जगताप(४७), अक्षय केसरकर(१८) आणि सीता केसरकर(६०) ही जखमी व्यक्तींची नावे आहेत.मुंबई महापालिकेने आधीच ही इमारत धोकादायक इमारत म्हणून जाहीर केल्याने या इमारतीतील बहुतांश कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. फक्त दोन कुटुंबे या इमारतीत रहात होती. डिसुझा कुटुंब आणि एका वकिलाचे कुटुंब इमारतीच्या तळमजल्यावर आणि दुस-या मजल्यावर रहात होते.आतापर्यंत चार जणांना ढिगा-याखालून बाहेर काढले असून, अजून सहाजण आत अडकल्याची भिती आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात डॉकयार्ड रोड येथील मुंबई महापालिका कर्मचा-यांची इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ६१ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. त्याआधीही मुंबई-ठाण्यामध्ये अनेक धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two × = 12