
नागपूर – कैद्यांकडे मोबाईल फोन अढळून आल्याने चर्चेत आलेल्या नागपूर मध्यवर्ती कारगृहाला आज सकाळी ७.३० वाजात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिली. या भेटीमुळे कारागृहातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
सकाळी ७.३० सुमारास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे कारागृह प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. ३१ मार्चला नागपूर मधून पाच कैदी पळून गेले होते. त्यानंतर जेलमध्ये कैद्यांकडून शंभरपेक्षा अधिक मोबाईल, तसेच पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले. त्यामुळे नागपूर कारगृहातील भ्रष्ट काराभारच चव्हाट्यावर आला.
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर कारागृहाला भेट दिली. सुमारे ४० मिनिटांच्या भेटीनंतर मुख्ममंत्र्यांनी जेलच्या सुरक्षे व्यवस्थेतेबाबत अजून सुधारणा करण्याची आवश्यक्ता असल्याचे म्हटले. तसेच कारागृह प्रशासनाच्या संपूर्ण कार्यशैलीतही बदल आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची माध्यमांसह कोणालाही थांगपत्ता नसल्याने प्रशासनाबरोबर कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडाली. नागपूर कारागृह प्रकरणानंतर आतापर्यंत एकूण ११ तुरुंग प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.









