मुझफ्फरनगर दंगल; आरोपीचा मृत्यू

images.jpeg11

मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशामधील मुझफ्फरनगरच्या दंगल प्रकरणातील आरोपी प्रवीण कुमार यांचा आज (मंगळवार) येथील जिल्हा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला.
गेल्या वर्षी मुझफ्फरनगरमधील शामली येथे भडकलेल्या दंगलीत कुमार याने एका व्यक्तीची गोळी घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर अनेकांना जखमी केल्याचा ठपकाही कुमारवर होता. हृदयविकाराचा झटका येताच कुमार याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × 1 =