अलिबाग- अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांचा रविवारी मुरुड येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत.
समुद्रात पोहोयला गेले असताना ही दुर्घटना घडली. या सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
चेंबूर येथील घाटलागाव परिसरातील १५ जण अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ते सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील सहाजण बुडाले. यात विनोद झलाई, दिनेश पवार, दिलीप गोले, संजय पांचाळ, शंकर चव्हाण आणि रोहित झाला यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ४० ते ४५ वयोगटातील आहेत.










