मुस्लिमांची लोकसंख्या वाढतेय, सुस्साट

Muslim child greets a tourist with a flower
वॉशिंग्टन- वर्ष २०५० पर्यंत ख्रिश्चन धर्म ३१ टक्के (२.९ अब्ज) लोकसंख्येसह जगातील सर्वात मोठा धर्म असेल, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा फक्त एक टक्क्याने कमी, म्हणजेच २.८ अब्ज इतकी असेल, असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. तर जगातील सर्वाधिक मुस्लिमांची संख्या ही भारतात असेल आणि हिंदूंची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या तिसर्‍या क्रमांकावर असेल असे पीयू रिसर्च सेंटरच्या संशोधनात म्हटले आहे.
जगभरातील प्रमुख धर्मांचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, भारत इंडोनेशियाला मागे टाकत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.
जगभरात हिंदूची आकडेवारी ३४ टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. तर आगामी चार दशकात ख्रिश्चन धर्म हा पहिल्या स्थानावरच असेल. २०५० मध्ये जगात हिंदुंची लोकसंख्या १.४ अब्ज, मुसलमानांची लोकसंख्या २.८ अब्ज, ख्रिश्चनांची लोकसंख्या २.९ अब्ज असेल. बौद्ध धर्मीयांच्या लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही असे या अहवालात म्हटले आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लिम आज इंडोनेशियात आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार तिथे मुस्लिमांची संख्या २०२.९ दशलक्ष इतकी आहे. पाकिस्तानात २०१०च्या गणनेनुसार १७ कोटी ८० लाख ९७ हजार मुस्लिम लोकसंख्या आहे, तर भारतात सुमारे १७ कोटी ६० लाख मुस्लिम राहतात.
परंतु, देशात मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढील ३५ वर्षांत, इंडोनेशियापेक्षा जास्त मुस्लिम भारतात असतील, असे या संशोधनात म्हटले आहे. परंतु, २०५० मध्येही भारत हे हिंदूबहुल राष्ट्रच असेल, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = twelve