मृत्यूच्या दाढेतून भावाने बहिणीला वाचवले

images
मुंबई – एक्स्प्रेस पकडण्याच्या गोंधळात पाय निसटून सात वर्षांची चिमुरडी प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडते आणि एकच गोंधळ उडतो. शनिवारी सकाळी मध्य रेल्वेवरील दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर थरारक प्रसंग निर्माण होतो. आपली बहीण प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडल्याचे समजताच भाऊ जिवाच्या आकांताने तिला सुरक्षितपणे वाचवण्यासाठी उडी मारतो. अखेरीस दोघेही अंगावर एकही ओरखडा उमटता बचावतात.
उत्तर प्रदेशमधून आलेले भारद्वाज कुटुंबीय शनिवारी मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यात संजीव भारद्वाज आणि त्यांच्या दोन बहिणी, भावाचा समावेश होता. सकाळी सात वाजून एक मिनिटांनी दादर येथून सुटणारी इंटरसिटी पकडण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली होती. ही गाडी पकडण्याच्या गोंधळात सुनीताचा (७) पाय सरकून ती गॅपमध्ये अडकली. हे पाहताच तिची बहीण अनिता (१६) आणि दुसरा भाऊ शंकर यांनी मदतीसाठी टाहो पुकारला. संजीवने खाली उतरून तिला आडवे पडत घट्ट धरून ठेवले. त्यांचा आवाज ऐकून एका प्रवाशाने तात्काळ आपत्कालीन मदतीसाठी असणारी साखळी खेचली. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या मिस्त्री नावाच्या कॉन्स्टेबलनेही गार्डला त्याची माहिती दिली. तोपर्यंत इंटरसिटी सुमारे २० मीटर पुढे गेली होती. पण सुनीता आणि तिच्या मदतीसाठी धावलेला संजीव हे दोघेही सुरक्षित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × = thirty six