मेधा पाटकरांचा आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा

medha-patkar
नवी दिल्ली – आम आदमी पक्षामध्ये सुरु असलेल्या केजरीवालशाहीला कंटाळून आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना ज्या पध्दतीने पक्षातून काढण्यात आले त्याचा मेधा पाटकर यांनी निषेध केला असून, त्यांना अन्यायी वागणूक देण्यात आली असे पाटकर यांनी म्हटले आहे. पाटकर यांनी मागच्यावर्षी आपच्या तिकीटावर मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढवली होती.आपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या शनिवारच्या बैठकीमध्ये गृहयुध्दाने टोक गाठले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांची बाजू ऐकून न घेता बहुमताच्या जोरावर त्यांची राष्ट्रीय कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये लोकशाहीची हत्या झाली असे बैठकीतून बाहेर आलेल्या योगेंद्र यादव यांनी सांगितले. बैठकीपूर्वी यादव-भूषण यांचे नेतृत्व मानणा-या कार्यकारीणीच्या सदस्यांना आतमध्ये न सोडल्यामुळे योगेंद्र यादव बैठकस्थळीच धरणे आंदोलनाला बसले होते. यावेळी बैठक स्थळी योगेंद्र यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × six =