मोदींच्या सभेपूर्वी गयामध्ये दोन बॉम्बस्फोट

गया – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गयामध्ये होणा-या सभेपूर्वी माओवाद्यांनी या जिल्ह्यात दोन मोबाईल टॉवर शक्तीशाली स्फोटांमध्ये उडवून दिले आहेत.
गयामध्ये गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचार सभा होणार आहेत. बुधवारी मध्यरात्री माझहोली आणि दुमारिया बाजार या गावात मोठया संख्येने जमलेल्या माओवाद्यांनी दोन शक्तीशाली स्फोट घडवून आणत खासगी कंपन्यांचे मोबाईल टॉवर उध्दवस्त केले.अलीकडेच छत्रा येथे सुरक्षापथकांच्या कारवाईत दहा माओवादी मारले गेले होते. त्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी गुरुवारी बिहार आणि झारखंड बंद पुकारला आहे. माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सासाराम आणि गयामध्ये गुरुवारी मोदी दोन निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत.माओवादी आणि दहशतवाद्यांकडून कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यानुसार आम्ही सुरक्षेच्या उपायोजना केल्या आहेत असे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six × = 24