
यवतमाळ, दि. २८ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था मावळ्याविना सेना अशी झाली आहे. संस्थापक अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या एककल्ली कारभारामुळे मनसे हा पक्ष दुभंगत चालला असून, आता जिल्ह्यातही मनसेला प्रचंड मोठे खिंडार पडले आहे. जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से यांच्यासह शेकडो मनसे सैनिकांनी पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीला कंटाळून शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला.
मुंबईसह मोठ्या शहरात रोजगारानिमित्त आलेल्या परप्रांतीयांच्या दबंगखोरी विरोधात राज ठाकरे यांनी बिगुल फुंकला होता. मराठी भाषेच्या अस्मितेचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी २००५ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. २००९ च्या विधानसभेत तब्बल १३ आमदार मनसेचे निवडून आलेत. अल्पावधीतच या पक्षाला यश मिळाले असताना राज ठाकरे यांच्या जवळील निकटवर्तीय नेत्यांनी मनमानी करीत पक्षाची प्रतीमा मलीन केली. परिणामी २०१४ च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा जणू सफायाच झाला. जिल्ह्यात या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन खेडोपाडी पक्षाची पाळेमुळे रूजविली. त्यामध्ये मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से यांनी गावोगावी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. मात्र पक्षातील नेतृत्वामुळे दिवसेंदिवस पक्षाचा सफाया होत असल्याचे पाहून अखेर त्यांनीही मनेसला रामराम ठोकला. शुक्रवारी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांचे निवासस्थानी बोक्से यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी कॉंग्रेसचे नेते अरूण राऊत, जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जि.प. सदस्य राहुल ठाकरे, रवी ढोक, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. बोक्से यांचेसोबत कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेणाºयांमध्ये जांभोºयोच नितीन बागेकार, वाटखेडचे महेंद्र अगलदरे, खैरगावचे सरपंच गणेश चव्हाण, ईचोरीचे माजी सरपंच विष्णू मुरमुरे, आकपुरीचे शाखा अध्यक्ष योगेश खरात, बारडचे दिलीप फुपरे, बोरीसिंहचे गजानन वायखळे, महादेव नागोसे, शाखा प्रमुख किशोर शेठे, दिलीप चिंतावार, रुईचे योगेश महल्ले, वडगावचे सचिन गुल्हाणे, हिवरीचे अमोल चौधरी, सालोटचे गजानन बोंडे, रोहटेकचे उमेश पेंदोर, उमरसºयाचे अरूण भिसे, साचखेडचे नितीन उईके, हातोल्याचे दिलीप आडे, लाडखेडचे राजेश विरुळकर, शाखाध्यक्ष नीलेश वानखेडे, पाथ्रडदेवीचे उमेश केवदे, धवळसरचे उमरेश रोहनकर, भोसाचे सुरेश वाघमारे, चौधºयाचे अविनाश राठोड, सावरगडचे संजय गोडे, यांचेसह ४०० कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.









