यवतमाळात सात लाखाची घरफोडी

IMG_4799
यवतमाळ – शहरातील टिळकवाडी येथील फोटो ग्राफरचे घर फोडून सात लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना गुरुवारी रात्री उजेडात आली. अश्विन आनंद वगारे रा. टिळकवाडी हे आपल्या कुटुंबीयासह कापड खरेदी करण्यासाठी गुरुवारी अमरावती येथे गेले होते. अशातच चोरट्याने घरफोडून कपाटातील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, अंगठी, पोत, चांदीचे दागिने, नगदी १० हजार रुपये असा एकुण सात लाख ५०० रुपयाचा माल चोरुन नेला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घरी परत आल्यानंतर ही घटना उजेडात आली. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, डी.बी. पथकाने भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथक व अंगुली मुद्रा तज्ञांना पाचारण केले होते. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्घ गुन्हा  दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 4