यवतमाळात ७० लाखांची घरफोडी

यवतमाळ – शहरातील धामणगाव बायपास पिंपळगाव येथील दालमिल व्यावसायिकांचे घर फोडून हिºयासह ७० लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. आज रविवारी सकाळी हा प्रकार कामगारांच्या निदर्शनास आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
विनोद भरतीया रा. धामणगाव बायपास पिंपळगाव रोड हे दोन दिवसापूर्वी आपल्या कुटुंबीयासह अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अशातच काल रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून हिरे, सोन्याचे दागिने, चांदी, रोख आदी ७० लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. अंगुली मुद्रा तज्ज्ञ सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र नक्षणे, अमित मेश्राम यांना पाचारण करून कपाटावरील चोरट्याचे ठसे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ two = 5