यवतमाळ जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ

boarwel
यवतमाळ – गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक आणि संपुर्ण पावसाळाभर सतत पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या भूजलपातळीत सरासरी १.३३ मिटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे. महागाव तालुक्यात ही वाढ दोन मिटरपेक्षा अधिक म्हणजे २.१० मिटर इतकी असून सहा तालुक्यांमध्ये दीड मिटरपेक्षा जास्त वाढ झालेली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत असतांना एकीकडे चिंतेची स्थिती असतांना यावर्षी  अचानक झालेली वाढ दिलासा देणारी ठरणार आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात सतत पाऊस कोसळला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सरासरी  पर्जन्यमान ९११.३४ इतके असतांना प्रत्यक्षात १२३२.१० मिलीमिटर इतके पर्जन्यमान (पाऊस) झाले. कोसळलेला पाऊस मोठ्या प्रमाणावर भूगर्भात साठवल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून ही वाढ झालेली दृष्टीस पडत आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने मार्च महिण्यात जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यात निरिक्षण विहिरींच्या स्थिर भूजल पातळीचा अभ्यास करण्यात आला. १९१ विहीरींचे त्यासाठी निरिक्षण करण्यात आले. या निरिक्षणात जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटरने भूगर्भातील पाण्यात वाढ झाली असल्याचे आढळले.  भूगभर्पातळीत तालुकानिहाय झालेली वाढ पुढील प्रमाणे आहे. महागाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.१० मिटरने वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ उमरखेड १.९९ मिटर, आर्णी १.६७ मिटर, दिग्रस १.६० मिटर, दारव्हा १.५५ मिटर, कळंब १.५२ मिटर, बाभुळगाव १.२६ मिटर, घाटंजी १.४७ मिटर, नेर १.३२ मिटर, पुसद १.४७ मिटर, राळेगाव १.२५ मिटर, यवतमाळ १.४७ मिटर, मारेगाव ०.८९ मिटर, पांढरकवडा ०.९२ मिटर, वणी ०.४३ मिटर तर झरी जामणी तालुक्यात ०.४९ मिटरने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ जिल्ह्यात सरासरी १.३३ मिटर इतकी आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने पाण्याचे स्त्रोत बळकट होणार असून पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भविष्याचा विचार करता ही वाढ जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × nine =