यवतमाळ नगर परिषदेचा १०३ कोटींचा अर्थसंकल्प सादर

2014-11-15~14ytph31_ns
यवतमाळ , दि. २६ – नगरपरिषदेने २०१४-१५ या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प आज गुरुवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. १०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात कर वसूली उत्पन्नाचा ताळमेळच नाही. शासकीय अनूदानाच्या भरोशावर अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, नगर पालिकेने तोटा लपविल्याचे मत व्यक्त होत आहे.
शहराच्या विकासाचे बारा वाजवणाºया नगर पालिकेने आज गुरुवारी अर्थसंकल्प सादर रून शहरवासीयांची शुद्घ धुळफेक केली आहे. शासकीय अनुदानातून प्राप्त होणाºया रक्कमाच नगर पालिकेने अंदाजपत्रकात सामाविष्ठ केल्या आहे. राष्ट्रीय मत्स्यीकी विकास अनुदान थेट दोन कोटी दाखविण्यात आले आहे. यापूर्वी ५० लाखांपैकी केवळ १८ लाख मिळाले आणि ३१ लाख येतील असे दाखविण्यात आले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ वाढीव क्षेत्र विकास कामांचे एक कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच प्रमाणे बांधकाम शुल्कातही घसघशीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. शासनाकडून अनुदाने व अंशदानापोटी २२ कोटी ३४ लाख २७ हजार मिळतील असे दाखविण्यात आले आहे. बजेटमध्ये नगराध्यक्षांच्या अधिकारातील आकस्मिक निधी खचार्ला कात्री लावत २० लाखावरून १५ लाख करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानाची तरतूद ३० लाखावरून आठ लाख इतकीच करण्यात आली आहे. आकस्मिक पाणी पुरवठ्याच्या बजेटमध्ये तब्बल दहा पटीने वाढ करीत दोन लाखावरून थेट १२ लाखाची तरतूद केली आहे. वीज बिलाचा खर्चही २५ लाखावरून एक कोटी होईल असे दाखविण्यात आले आहे. संगणक खरेदीसाठी नव्याने दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी मंजूर केलेल्या दहा लाखांपैकी केवळ नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन लाख खर्च झाल्याचे दाखविले आहे. अनेक योजनांवर प्रस्तावित निधीच खर्च झालेला नाही. निधी पडून असतानाही विकास कामे मार्गी लागलेली नसून, पाणीपूरवठा व स्वच्छता अभियाना अंतर्गतच्या मोफत नळ व शौचालय योजनेचे भिजत घोंगडे आहे. चंद्रपूरच्या एजंन्सीला देयके देखील अदा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील तूट सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ नये यासाठी मोठ्या दिमाखादारपणे नगर पालिकेने आकडेमोड के ली आज सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पावर सदस्यांनीही आक्रमक भूमिका घेतली नसल्याने शहरवासीयांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 3 = twenty seven