
यवतमाळ, दि. ८ -नगर पालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात पुकारण्यात आलेल्या यवतमाळ बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. रोजगार हिरावल्या गेल्यामुळे व्यवसायीकांच्या संयमाचा उद्रेक झाल्याने नागपूरकडे जाणाºया बसवर दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.
शहराची वाढती लोकसंख्या, मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पादचाºयांचा फुटपाथही अतिक्रमणाच्या विळख्यात असल्यामुळे रहादारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबतचा निर्णय घेऊन शहरात ३ जानेवारीपासून मोहिम राबविण्यास प्रारंभ केला. आर्णीरोड, धामनगावरोड, गोधणीरोडवरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर इतर मार्गावरील व नेताजी चौकातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या. गेल्या चार दिवसात शेकडो दुकानांवर बुलडोजर चालविण्यात येत असताना, याला नेताजी चौकातील व्यवसायींकानी विरोध करीत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. विदर्भवीर माजी खा. जांम्बुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात व्यवसायींकानी नेताजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र प्रशासनाने याकडे डोळेझाक करीत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. शहरातील जवळपास अर्ध्याअधिक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर आज नेताजी व दत्त चौकातील अतिक्रमण हटविल्या जाणार असल्यामुळे याला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील व्यवसायींकानी एकत्रित येवून यवतमाळ बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला आज समिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही पेट्रोलपंप धारकांनी व्यवसायीकांच्या बंदला पाठींबा दर्शविला होता. नेताजी चौक, आर्णी रोड, दत्त चौक, मेन रोड, टांगा चौक, आखाडा चौक, धामणगाव रोड, दारव्हा नाका आदी मार्गावर असलेली प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. अतिक्रमणधारकांनी कुटुंबियासह नेताजी चौकात सकाळपासूनच ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान एम. एच. १४ बीटी १२८२ क्रमांकाची नागपूर-वर्धा व एम. एच. ४० वाय ५६८३ क्रमांकाची यवतमाळ-औरंगाबाद बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस दलाच्या वतीने चौकाचौकात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









