यवतमाळ-लोहारा 4 किमीचा रस्ता पथदिव्यांनी उजळला

DSC_1186
यवतमाळ – यवतमाळ बसस्थानकावरून लोहाराकडे जाणारा रस्ता हा यवतमाळ शहरातील सर्वाधिक महत्वाचा आणि वर्दळ असलेला रस्ता आहे. परंतु या संपुर्ण 4 किमीच्या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्यावेळी वाहतूकीस अडचणीचे होत होते. विशेष निधीतून नुकतेच या रस्त्यावर संपुर्ण पथदिवे लावण्यात आहे. 4 किमीच्या हा रस्ता प्रकाशाने उजळून निघाला असून शहराच्या सौंदर्यात यामुळे भर पडली आहे.
काही दिवसांपुर्वी केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्याच्या भव्यतेत वाढ होण्यासोबतच शहराला एक नवीन चेहरा या रस्त्यामुळे प्राप्त झाला. वाहतूकीसोबतच सर्वसामान्य यवतमाळकरांना हा रस्ता मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा ठरला आहे. मात्र या संपुर्ण रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी काही ठरावीक ठिकाणे वगळल्यास संपुर्ण रस्त्यावर अंधार राहायचा. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहतूकीस अडचणी निर्माण होत होत्या.
तत्कालीन आमदारांच्या प्रयत्नाने यवतमाळ शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या निधीतून या संपुर्ण रस्त्यावर पथदिवे बसविण्याचे काम घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने हे काम युध्दपातळीवर हाती घेतले. मे.न्युटेक, नागपुर या कंपनीला पथदिवे उभारण्याचे काम देण्यात आले होते. या संपुर्ण 4 किमीच्या रस्त्यावर मे.के.लाईट या चेन्नई येथील नामांकित कंपनीच्या बनावटीचे डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट असून संपुर्ण विदर्भात पहिल्यांदाच अशाप्रकाराचे पोल यवतमाळ शहरात लावण्यात आले आहे.
या पोलवर 250 वॅट मेटल हॅलाईड लॅम्पचा उपयोग करण्यात आला आहे. या लॅम्पमुळे रस्त्यावर पडणाऱ्या रुपेरी प्रकाशाच्या झोतामुळे एखाद्या मेट्रोपॉलीटन सिटीमध्ये असल्याचा भास रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून फिरतांना होतो. या संपुर्ण रस्त्यावर एकूण 160 पोल बसविण्यात आले असून प्रत्येक पोलवर दोन दिवे याप्रमाणे 320 पथदिवे लावण्यात आले आहे. सदर पथदिवे बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे अभियंता दिनेश खोंडे, कार्यकारी अभियंता अरूण आतराम, उपअभियंता प्रदिप तंबाके, सहाय्यक अभियंता निता बोकडे व कंत्राटदार प्रदिप देशमुख, प्रफुल्ल मोहोड, राजा भोयर यांनी पुर्ण केले. या रस्त्यावर लागलेल्या दिव्यांमुळे यवतमाळ शहराच्या भव्यतेत भर पडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven + 9 =