यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी २९ उमेदवारांचे ४३ अर्ज

election-330x185
यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज शनिवारी २९ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसाअखेर उमेदवारी दाखल करणाºयांची संख्या ४४ इतकी झाली असून या उमेदवारांनी एकून ७२ अर्ज दाखल केले आहे.
आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये ना अ‍ॅड.शिवाजीराव शिवरामजी मोघे (इंडीयन नॅशनल कॉंगेस-४), खा भावना पुंडलीकराव गवळी (शिवसेना-४), माजी सहकार आयुक्त बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), माजी पोलीस महानिरीक्षक मोहन मल्लु राठोड (भारीप बहुजन महासंघ-१), अ‍ॅड. नरेश फुलसिंग राठोड (आम आदमी पार्टी-३), प्रशांत पंढरीनाथ सुर्वे (अपक्ष-१), रामकृष्ण पुंडलीकराव सावके(भारतीय कम्युनिष्ट पक्ष-१), दिनेश फुलसिंग राठोड (अपक्ष-१), नरेश महादेवराव गुघाने (अपक्ष-१), राजानंद श्रावणजी गणवीर (अपक्ष-१), विनोद नारायण चव्हाण (अपक्ष-१), हेमेंद्र राजेश्वर ठाकरे (अपक्ष-१), रामराव सवाई पवार (अपक्ष-१), उत्तम भगाजी कांबळे (प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी-३), अबरार अहेमद मेहबुब खान (वेलफेअर पार्टी आॅफ इंडीया-१), शेख मेबबुब शेख छोटू (बहुजन समाज पार्टी-१), शामकुमार बापुराव लोखंडे (अपक्ष-१), राजु उर्फ भरतराजे उध्दवराव पाटील (मनसे-१), इंदुवर काशिराम राठोड (बहुजन मुक्ती पार्टी-१), गोविंद देवाजी चव्हाण (अपक्ष-१), अहेमद परवेज इकबाल (समाजवादी पार्टी-२), रघुनाथ शंकरराव शेळके (आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी-१), अशोक शंकरराव शेंडे(अपक्ष-२), सुधाकर नामदेव घायवान (रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडीया-१), बळीराम परशराम राठोड(बहुजन समाज पार्टी-१), राजेंद्र विठ्ठल गायकवाड (लोकशासन-१), प्रकाश चिमणाजी धोत्रे (अपक्ष-१), ज्ञानेश्वर शंकरराव राठोड, सुरजुसे सुरेश श्रावणजी (अपक्ष-१), पुरूषोत्तम डोमाजी भजगवरे (राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस पार्टी-१) यांचा समावेश आहे. शुक्रवार २१ मार्च पर्यंत सुरेश राजाराम मुखमाले, बंडू गणपत मेश्राम, उपेंद्र बाबाराव पाटील , इंदूवर काशीराम राठोड , प्रकाश रघुनाथ राऊत, महादेव हरीभाऊ ताटके, जांबुवंतराव बापुराव धोटे , उल्हास वसरामजी जाधव, प्रशांत पंढरीनाथ सुर्वे, पवार रमेश गोरसिंग, मनिष रामकृष्ण ढाले, मुधकर रंगलाल पवार, रमेश विठोबा गुरनुले , शेख जब्बार शेख युनुस, ज्ञानेश्वर तुकाराम मेश्राम, युनुस शेख अ.गनी, संदीप अनंतराव देवकते यांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत ४४ उमेदवारांनी ७२ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज १४ उमेदवारांनी ४४ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण १३१ उमेदवारांनी ३४६ अर्ज नेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 6 = seven