यवतमाळ – बाभुळगाव तालुक्यातील मादणी बोरगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उकंडा जंगल शिवारात ही घटना घडली असून अनैतिक सबंधातून त्याचा खून केल्याची चर्चा आहे.
दशरथ मारोती मदने (२३) रा. मादणी (बोरगाव) असे मृतकाचे नाव आहे. दशरथ हा अॅपे चालवून आपली उपजिवीका भागवित होता. अॅपे घेऊन तो दररोज यवतमाळ येथे येत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो अॅपे घेऊन यवतमाळात आला होता. रात्री त्याने मद्यप्राशन केल्याने त्याच्या मित्राने अॅपे घरी नेऊन दिला. अशातच गावात रात्री २ वाजता कापूस गाडी भरत असलेल्या नागरिकांना तो गावात दिसला होता. अशातच आज सकाळी उकंडा शिवारात रोडवर त्याला मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच शहरचे प्रभारी ठाणेदार अमोल माळवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावर विषारी औषधीची बॉटल व शिखात महिलेसोबत शारीरीक सबंध करतांना सुरक्षेचा उपाय म्हणून वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. मृतकाच्या दंडावर जखमा व गळा आवळल्याच्या खुना दिसून आल्या. त्यामुळे या युवकाचा अनैतिक सबंधातून त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने विषारी औषधी पाजून खून केल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधान आले आहे. संतोष कोकरे रा. नेताजी नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.









