युवकाच्या मृतदेहासह पोलीस ठाण्यावर धडक

2014-11-03~maharashtrapolicelogo_ns
यवतमाळ , दि. १६ – आंध्र प्रदेशात कामासाठी गेलेल्या युवकाचा संशस्पद मृत्यू झाल्याची घटना आज घडली.  संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन पांढरकवडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शेख शाहरुख शेख कादर (१९) रा. गोंडवाकडी असे मृतकाचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील गोंडवाकडी येथील युवकला त्याचा नातेवाईक बुरान खान चाँद खान याने फॅकटरीमध्ये काम लाऊन देतो म्हणून नेले. गेल्या चार महिन्यापासून युवक आंध्रातील गुंटूर येथे होता. दरम्यान आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुरान खान युवकाचा मृतदेह घेऊन गोंडवाकडी येथे आला. यावेळी मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या आईवडीलांनी हंबरडा फोडला. काम करीत असताना, त्याचा मृत्यू झाल्याचे बुरान खान याने सांगितले. मात्र मुलाच्या मृत्यूवर शंका उपस्थित करीत युवकाच्या मृतदेहासह नातेवाईकांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढून गुन्हा नोंद केला. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + nine =