युवक कॉंग्रेसच्या लोकसभा क्षेत्रीय अध्यक्षपदी राहुल ठाकरे

युवक कॉंग्रेसच्या लोकसभा क्षेत्रीय अध्यक्षपदी राहुल ठाकरे
युवक कॉंग्रेस निवडणूक
यतवमाळ – यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रात आज शुक्रवारी पार पडलेल्या युवक कॉंग्रेस पदाधिकाºयांच्या निवडणुकीत पुनश्च राहुल ठाकरे विराजमान झाले़ तब्बल १ हजार ४४ बुथस्तरीय युवक मतदारांनी ठाकरे यांना भरीव मते देत आपली पसंती दिली़
कॉंग्रेसमध्ये लोकशाही रुजावी म्हणून राहुल गांधी यांनी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांची निवड निवडणुकीद्वारे करण्याचा पायंडा पाडला आहे़ त्या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रीय युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीचे मतदान घेण्यात आले़ राहुल ठाकरे यांना पुनश्च ४४० बुथस्तरीय युवक मतदारांनी आपली मते दिल्याने ते अध्यक्षपदी विराजमान झाले़ वाशीम येथील गजानन भगत यांना १६० मते पडली असून, ते युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवडले गेले आहे़ यवतमाळातील अ‍ॅड़ रोहीत देशमुख यांना तिसºया पसंतीची १३५ मते पडल्याने लोकसभा क्षेत्राच्या महासचिवपदी ते निवडले गेले आहे़ मंगरुळपीर येथील श्रीहरी इंगोले यांना ८१, अनुसूचित जाती प्रवर्गातून नितीन गुघाने यांना ७५, वैभव जवादे ३५ तर मोहदा येथील रिजवान शेख यांना अल्पसंख्यांकाच्या प्रवर्गातून ३३ मते मिळाल्याने या सर्वांना युवक कॉंग्रेसचे सरचिटणीसपदी विराजमान होता आले़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + = 5