युवतीचा मृतदेह आढळला, खुनाचा संशय

2014-07-04~nnd1_ns
पाटणबोरी (यवतमाळ), दि. ३० – येथील मुख्यरस्त्याच्या कडेला इंदिरानगरातील २२ वर्षीय युवती योगीता नागोराव सिडाम हीचा मृतदेह घरापासून ५०० मीटर अंतरावर खुनी नदीच्या पात्रात आढळला. ३० एप्रिल रोजी या युवतीचे लग्न ठरले होते. त्यापूर्वीच तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३.३० पासून घरातून प्रात: विधीसाठी गेली होती. मात्र सकाळी शोधाशोध घेतली असता तिचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळला. घरापासून मुख्यरस्ता पार केल्यानंतर नाल्याच्या काठावर टेंभा, युवतीचे कपडे जळालेल्या अवस्थेत दिसले. नाल्याच्या पात्रात दगडावर रक्त सांडलेले आढळून येत आहे. नाल्याच्या पात्रातून नदीकडे जाणाºया रस्त्यावर रक्ताचे थेंब व रक्त सांडलेले दिसत आहे. यावरून युवतीचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. युवतीला जाळल्यानंतर वरून नाल्यात दगडावर फेकले असावे नंतर दूरवर खुनी नदीच्या पात्रात मृतदेह फेकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पांढरकवडा उपविभागीय पो. अ. भालचंद्र महाजन व पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून, सर्व बाजुने बारीक सारीक बारकावे तपासून पाहिल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = eighteen