यूपीएससीचा निकाल जाहीर, गौरव अग्रवाल देशात पहिला

images
मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. गौरव अग्रवाल याने संपूर्ण देशातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर मनिष शर्मा आणि रचित राज यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावण्यात यश मिळाले आहे.  महाराष्ट्राच्या विपिन इटणकरने देशातून १४ वा क्रमांक पटकावला आहे. यादीत पहिल्या २५ जणांमध्ये १५ मुलांचा आणि १० मुलींचा समावेेश आहे.
देशातील एकूण ११२२ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यंदाच्या निकालात महाराष्ट्रालाही मोठे यश मिळाले आहे. राज्यातून एकूण ८० विद्यार्थींना यश मिळाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ११२२ उमेदवारांना यश मिळाले आहे. यामध्ये आयएएसच्या १८० जागा, आयपीएसच्या १५०, आयएफएसच्या ३२, सेंट्रल सर्व्हिस(ए)च्या७१० आणि सेंट्रल सर्व्हिस(बी)च्या १५६ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत यशस्वी झालेल्या एकूण ११२२ उमेदवारांपैकी सर्वसाधारण गटातील ५१७, मागासवर्गीय जातीतील ३२६, अनुसूचित जाती१८७ आणि अनुसूचित जमातीतील ९२ उमेदवारांना यश मिळाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ही यूपीएससीची लिखित परीक्षा घेण्यात आली होती. तर एप्रिल -जून दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

यूपीएससीत यश मिळवलेले महाराष्ट्रातील उमेदवार
विद्यार्थ्यांचे नाव         रँक
बिपीन विठोबा इटणकर     १४
शीतल पटले         २२
प्रभव जोशी         २३
शशांक शुभनकर         ६०
गोयल मनोज         ७१
धीरजकुमार कांबळे     ८२
राठोड विजय चंद्रकांत     ८४
ठाकूर प्राजक्ता प्रभाकर     १३२
थॉमस प्रियंका         १५८
नरवने अबोली सुनिल     १६३
जैन अर्पित         १९४
ओंम्बासे सचिन छगनलाल २१५
अमोल येडगे         २५४
थारवल अभिषेक सदानंद     २५६
निखील सारस्वत         २८१
प्रियांका माशेलकर     ३००
निखिल फुंडे           ३०२
पडिया अक्षय जुगलकिशोर    ३०३
डोईफोडे सागर दत्तात्रय     ३१०
वरवंटकर प्रसाद हनमंतराव ३१६
देवांगी स्वर्णकर         ३२२
गोवेकर मयूर रातीलाल     ३४७
निखिल पिंगळे         ३५३
शेवाळे अभिजित तुकाराम ३५४
भांगेपाटील पुष्कराज रमेश ३५७
अभिषेक महाजन     ३६६
सात्विक देव         ३७३
धनाजी कदम         ३८१
हर्षल मेटे         ३८६
माधव सुळफुले         ३८७
अकोलकर समीर दिलीप     ४०३
विपुल देव         ४११
मोहाडिकर किरण मोहन     ४८२
पाटील मयूर गुलाबराव     ५१४
खरात संजय ज्ञानदेव     ५३५
कुंभार अजित बालासो     ५८८
माने अमितकुमार बाबूराव ६१६
भूषण पाटील         ६१७
गुरव अभिजित दिलीप     ६७२
महेश चव्हाण         ६७९
साठे संदिप प्रदिपराव     ७०६
स्नेहल कारले         ७१७
सुंभे प्रशांत अप्पासाहेब     ७१८
देवकाते हिमालय काशिनाथ७२७
तांबे अनंत सुभाष     ७२८
चेतन कळमकर         ७३१
उंडे योगेश पांडुरंग     ७३७
स्वच्छंद चव्हाण         ७५०
सोनवने ऋषीकेश भगवान     ७६०
अमित खटावकर         ७६५
सोनकवडे सोनल लक्ष्मीदास ७७४
जाधवर विवेकानंद राजेंद्र     ७९९
अंकिता ढाकरे         ८००
रामटेके मृणमय प्रकाश     ८११
भस्मे विवेक दत्तात्रय     ८१२
चव्हाण प्रविण मोहनदास     ८१५
निगवेकर रोहित रत्नकांत     ८२६
सुशील शेंडगे         ८२७
घोलप प्रज्ञा राजेंद्र     ८३०
तुरेराव प्रीतमकुमार     ८४९
कानडे सुजित चंद्रकांत     ८८१
भोकरे सुनिल शिवराम     ८८४
कविता पाटील         ८९०
गुल्हाने वसुंधरा अजय     ८९२
शिंदे अक्षय अशोक     ९०५
हाके अक्षय मच्छिंद्र     ९१५
दाभोळे दिलीराज चंद्रकांत     ९२०
शेटे मोतिलाल शहादेव     ९५५
पोटे गणेश संपतराव     ९७५
मोनिका पंगते         ९७९
कांबळे धिरजकुमार दिगंबरराव ९८२
भरसठ योगेश तुकाराम     ९८९
दगडे अदिनाथ लहानू     १०००
कपिल जोशी         १००६
पोळ हेमंत बळवंत     १०३९
विजया जाधव         १०७६
रोहणकर पियूष अरुण     १०८८
चौगुले बजरंग बंडू     १०९५
गवळी राजेश पुंजाजी     १११८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 6 = two