बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी ६ च्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून मदरुमकी गाजविली. पाठोपाठ येळ्ळूर गावात पोलिसांनी प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब केंद्राकडे दाद मागणार कर्हाड : कर्नाटकात मराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत. कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही., असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणार्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो. आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.









