राजनाथ सिंह थकबाकीदार

rajnath-singh
नवी दिल्ली -नैतिक स्वच्छतेसाठीही विशेष आग्रही असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दिग्गज गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव एमटीएनएल थकबाकीदारांच्या यादीत झळकले आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपच्याच काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे.
कृषक भारत संघाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने एमटीएनएलकडे थकबाकीदारांची यादी मागवली होती. त्यानुसार एमटीएनएलनेच सादर केलेल्या माहितीत राजनाथ यांनी ४३ हजार ९०० रु.चे बिल थकवल्याचे नमूद केले आहे. या यादीत सिंह यांच्यासोबतच सात विद्यमान, १६ माजी मंत्री व २९३ माजी खासदारांचा समावेश आहे. १९९८ सालापासून सुरू असलेल्या या खटल्यादरम्यान कोर्टाने कठोर भूमिका घेत २०१२मध्ये ही थकबाकी खासदारांच्या वेतनातून वसूल करण्यात यावी, असा आदेश दिला होता. मात्र या बड्या नेत्यांवर कारवाई करण्यासही एमटीएनएल कचरत आहे. याविषयीचा प्रस्ताव लोकसभा व राज्यसभा सचिवांकडे अजूनही प्रलंबित आहे. अनेकदा कंपनीने या थकबाकीदारांना नोटीस बजावून बिले भरण्याबाबत कायदेशीर कार्यवाही केली आहे. मात्र तरीही त्याकडे या प्रभृतींनी दुर्लक्ष केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − 8 =