‘राजलक्ष्मी मल्टीस्टेट’ला विदर्भस्तरीय पुरस्कार

d315750-large
यवतमाळ – विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी फेडरेशन द्वारा स्व. गोपाळरावजी राजुरकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा विदर्भ स्तरीय प्रथम पुरस्कार येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेटला मिळाला आहे. सलग तीन वेळा पुरस्कार जिंकणारी राजलक्ष्मी मल्टीस्टेट यवतमाळ ही एकमेव संस्था होय. हा पुरस्कार म्हणजे संस्थेप्रती विश्‍वास दाखविणार्‍या ठेवीधारकाचा, संस्थेच्या कर्तव्यदक्ष संचालक मंडळाचा, अधिकारी, कर्मचारीवृंदाचा, कर्ज घेऊन स्वत:चा विकास व पर्यायाने राष्ट्रीय कार्यात हातभार लावणार्‍या कर्जधारकांचा, मित्रमंडळींचा, हितचिंतकांचा सन्मान होय, सत्कार होय, गौरव होय, असे भाष्य अरविंद तायडे यांनी केले. सहकार क्षेत्रात अत्यंत भक्कमपणे उभी असलेल्या या संस्थेच्या अध्ययावत सुसज्ज वस्तुचा लोकार्पण सोहळा नजिकच्या काही दिवसात संपन्न होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गजानन बुरडकर सभागृह चंद्रपूर येथे हा पुरस्कार फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप राजुरकर, माजी आमदार हरिश्‍चंद्र वरखेडे, फेडरेशनचे उपाध्यक्ष वामनराव झाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तायडे, संचालिका संध्याताई तायडे, कार्यकारी संचालक क्षितीज तायडे, संचालक यु.डी. आगरे, बाबुसिंग कडेल, घनश्याम ढेंगळे, सल्लागार प्रताप पारसकर, ज्ञानेश्‍वर सुरजुसे, सुरेशसिंह जोई, उपसरव्यवस्थापक सुरेश अजमिरे, अधिकारी संजय इंगोले, नीलेश वाकोडे, संतोष गुल्हाणे, आनंद संगावार, मनोज येडे, वृषाली सुळे, पराग सुळे, रवी रहाणे, विजय मोडक, गीता शिंगोटे, संध्या इनामदार अमित ओक, आशिष तायडे, सलमानखान पठाण, संदीप महाजन, किशोर भागवत, स्वप्नील आठवले, दै. अभिकर्ता अनिल येरावार, विक्रम विठलानी, बिपीन मजेठीया, किशोर ठाकरे व कर्मचारी नितीन छपरवाल, विलास बन्सोड, भाग्यवान तेलंग, विलास सादे उपस्थित होते.
या पुरस्कारावर समारोपीय भाष्य करताना ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगण’! या ओळी प्रमाणे प्रबळ इच्छा शक्ती ही प्रगतीची जननी असून यशोशिखरावर नेणारा राजमार्ग आहे. संस्थेत असणारा तरूण वर्ग या पुरस्काराने प्रेरीत झाला असून जेष्ठांच्या मार्गदर्शनात नजिकच्या काळात असे अनेक मनाचे तुरे राजलक्ष्मीच्या मुकुटात पहायला मिळणार असा विश्‍वास या प्रसंगी संस्थेचे तरूण कार्यकारी संचालक क्षितीज तायडे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 3