यवतमाळ -राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या १५ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय शासणाने घेतला असुन या निर्णयाविरोधात पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परीषद राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ फेब्रूवारीला धरणे आंदोलन करणार आहे.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने डिसेंबर २०१३ ला शाळेतील पटसंख्येवर आधारीत शिक्षक पदे निर्धारीत करण्याचा निर्णय घेवून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहे.या निर्णयामुळे जिल्ह्यातील ४०० ते ५०० शाळा बंद होणार आहे.याचा परीणाम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील ८०० ते १००० शिक्षक अतिरीक्त ठरणार आहे.या शिक्षंकाचे समायोजन राज्यात करता येणे शक्य नसल्यामुळे शिक्षक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासनाने हा निर्णय घेतला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने शाळा बंद करा असे म्हटले नाही.शासनाने हा निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी १५ ला धरणे देणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील यानी सांगीतले आहे.









