रामपाल विरोधात पोलिसांची कठोर कारवाई, भक्त झाले हिंसक

Violent clashes at Satlok Ashram
चंदीगड- हरियाणामधील स्वयंघोषित संत रामपाल बाबाला अटक करण्यासाठी पोलिसांनी कोठर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांच्या या कारवाई विरोधात बाबाच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच एका जेसीबीला आग लावली आहे. मंगळवार सकाळपासून पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईमुळे हिसारमधील सतलोक आश्रम परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
रामपालला अटक करण्यासाठी गेलेले पोलिस आणि बाबाचे समर्थक यांच्यामध्ये मंगळवारी सकाळी जोरदार हाणामारी झाली. यावेळी समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला तसेच लाठीमारही केला. बाबांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात २००हून अधिक जण जखमी झाले. जखमींमध्ये १०० पोलिसांसह रामपालचे भक्त आणि काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी भक्तांना आश्रम परिसर रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र भक्तांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली.
दरम्यान, हरियाणाचे पोलिस महासंचालक एस.एन.वशिष्ठ यांनी जोपर्यंत रामपालला अटक केली जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरुच राहिल असे स्पष्ट केले. पोलिसांच्या या कारवाईत महिला आणि मुलांना कमीत कमी इजा होईल याची काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कारवाई करु नये म्हणून रामपाल याने आश्रमाच्या बाहेर महिला आणि मुलांना उभे केले आहे.
इतक नव्हे तर पोलिसांनी पेट्रोल बॉम्ब आणि अॅसीडच्या बाटल्या आश्रम परिसरातून जप्त केल्याचे वशिष्ठ यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी रामपाल याच्याविरोधान नव्याने एफआयआर दाखल केला आहे
दरम्यान आश्रमाचे प्रवक्त्याने रामपाल यांची प्रकृती ठीक नसल्याने ते अज्ञात ठिकाणी उपचार घेत असल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिस महासंचालकांनी रामपाल आश्रमातच असल्याचे म्हटले आहे.  दुसरीकडे रामपालच्या भक्तांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात पोलिसाच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
पोलिसाच्या या कारवाई दरम्यान काही पत्रकार जखमी झाले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने हरियाणा पोलिसांना नोटिस बजावली आहे. आयोगाने पोलिस महासंचालकांना याप्रकरणी दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 × two =