राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर

Ashok-Chakra-Award
मुंबई- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लष्करातील जवानांसाठी एक अशोक चक्र, तीन किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. याशिवाय मेजर मुकुंद वरदराजन यांना १५ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेले अशोक चक्र या यादीत समाविष्ट करण्यात आले असून ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोमवारी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.
राजपुताना रायफलचे जवान नाईक नीरज कुमार सिंग (मरणोत्तर) यावेळी  अशोक चक्र जाहीर करण्यात आले आहे. तर १५ ऑगस्ट रोजी राजपूत रेजिमेंटचे मेजर मुकुंद वरदराजन जाहीर झालेला अशोक चक्र (मरणोत्तर) यांचाही समावेश यात आहे. तर किर्ती चक्र पुरस्कारात राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन जयदेव, सुभेदार अजय वर्धन(मरणोत्तर) आणि गोरखा रायफल्सचे नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग या तिघांचा समावेश आहे.
शौर्य चक्रात पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), चार पॅरा (एसएफ)चे मेजर मुकुल शर्मा, आर अँड ओ फ्लाइटचे  इंजिनिअर मेजर अभिजय (मरणोत्तर), राष्ट्रीय रायफल्सचे  मेजर आाशुतोष कुमार पांडे, इंजिनिअर मेजर आर वामशी कृष्णन, ५/५ जीआर एफएफचे मेजर बिभांशू धोंडियाल, २० महारचे  नाईक स्वरुप कुमार घोराई, बटालियन पॅराशूट रेजिमेंटरचे पॅरादूपर बलविंदर सिंग (मरणोत्तर) आणि जम्मू व काश्मीर रायफल्सचे  रायफलमन मंगा राम यांचा यात समावेश आहे.
तर जीवनरक्षा पदकासाठी जितेश काळे, भूषण संखे हे मानकरी ठरले आहेत. धाडसाने दुस-याचा जीव वाचवणा-या व्यक्तींना तीन प्रकारच्या जीवनरक्षा पदक पुरस्कारांनी सन्मानित केले जाते तर पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि एक रकमी डिमांड ड्राफ्ट असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदा भारतीय हवाई दलातल्या ८३ जणांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सहा एअर मार्शल्सना परम विशिष्ट सेवा पदक, दोन एअर मार्शल्स, चार एअर व्हाईस आणि नऊ एअर कमांडर्सना अति विशिष्ट सेवा पदके जाहीर झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = seven