राष्ट्रीय एकात्मता दौड बंधुभाव वाढीसाठी मोलाची ठरेल – राहुल रंजन महिवाल

DSC_3630
दौडमध्ये हजारो यवतमाळकरांचा सहभाग
यवतमाळ : देशाची एकात्मता आणि राष्ट्रीय एकसंघता टिकवून ठेवने आवश्यक आहे. त्यादृष्टीने एकात्मता दौड महत्वाची ठरणार असून यातून एकमेकांप्रती बंधुभावणाही वाढीस लागण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौड विसर्जीत झाल्यानंतर स्थानिक पोस्टल मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुळकर्णी,
अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नरेंद्र टापरे, श्री.सिरोडकर, डॉ.राजेश अडपावार, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोस्टल मैदान येथून सकाळी 8 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. त्यानंतर पोस्ट ऑफीस चौक, एलआयसी चौक, बसस्थानक, नेताजी चौक, पाचकंदील चौक, येरावार चौक अशी फिरत दौड पुन्हा पोस्टल मैदानात विसर्जीत झाली. या दौडमध्ये हजारो यवतमाळकर नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. तसेच विविध सामाजिक संघटना, शाळा, विद्यार्थी, एनसीसी व स्काऊट गाईडचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. संपुर्ण मार्गात दौडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेसोबतच स्वच्छतेचा संदेश दिला. हातात घेतलेले फ्लेक्स, जनजागृतीपर संदेश व वाहनावर लावण्यात आलेल्या बॅनरद्वारे हा संदेश देण्यात आला. सहभागींनी मोठ्याप्रमाणावर एकात्मतेचे नारे देऊन हा संदेश संपुर्ण यवतमाळकरांना दिला. विविध सामाजिक संघटनांनी वाजत गाजत तसेच संगीताच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविला. दौडमध्ये संघटनांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × = twelve