राष्ट्रीय कुस्तीगीर शाहू चव्हाण यांचे निधन

Page_1

यवतमाळ –  आंतरविद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत   राष्ट्रीयस्तरावर दबदबा निर्माण करणारे   राष्ट्रीय कुस्तीगीर शाहू सदाशिव चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. शाहू चव्हाण यांनी आंबेडकरी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने अन्यायाविरोधात लढा दिला आहे. काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून ते परिचीत होते. त्यांचे मागे पत्नी भारती चव्हाण, मुलगा माजी नगरसेवक अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, समीर चव्हाण, स्नुषा नगरसेविका डॉ. अस्मिता चवण, मुगगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पाटीपूरा येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. येथील पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शाहू चव्हाण यांच्या निधनाने यवतमाळातील कुस्ती आणि सामाजिक चळवळीचे फार मोठी हाणी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × = 24