युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 11 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्यावतीने अविद्यार्थी युवकांसाठी राष्ट्रीय युवा कॉरप्स् योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागातील युवकांना समाज सेवा करण्याची संधी नेहरु युवा केंद्रामार्फत या योजनेव्दारे दिली जाते. यासाठी युवकांनी 3 मार्च 2014 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक, ज्योती मोहिते यांनी केले.
या योजनेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवा उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष या दरम्यान असावे. 1 एप्रिल 2014 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षाच्या आत असावे. म्हणजेच त्याचा जन्म 1 एप्रिल 1989 ते 1 एप्रिल 1996 या कालावधीतील असावा. जिल्ह्यातील 16 तालुक्यांकरीता 32 राष्ट्रीय युवा कॉरप्स् स्वयंसेवकाची निवड करावयाची आहे. त्यामुळे तालुक्यात कार्य करण्याकरीता त्याच तालुक्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल. सर्व जाती-जमातीच्या पुरुष व महिला उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी. पदवीधर उमेदवारांना प्राधान्य राहील. निवड झालेल्या उमेदवारांना सेवा कार्यासाठी मानधन व प्रवासभत्ता असे एकूण रुपये 2500 दर महा दिले जातील.
ग्रामीण भागात समाजसेवा करण्याची आवड असणाऱ्या इच्छूक युवकांना छापील अर्ज नेहरु युवा केंद्र, चंदन नगर, प्रजापतीनगर जवळ, वडगाव रोड, यवतमाळ येथे उपलब्ध आहे. अर्जासोबत गुण पत्रिका, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, राहिवाशी असल्याबाबत रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना त्यांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे. उमेदवारा एन.एस.एस., एन.सी.सी. स्काऊड-गाईड, युवा मंडळाचा कार्यकर्ता असल्यास तसा उल्लेख करावा व प्रमाणपत्र जोडावे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 3 मार्च 2014 आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.









