‘रेझींग डे’: विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्राची माहिती

666

यवतमाळ – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रेझींग डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शस्त्राची माहिती जाणून घेतली. त्यानंतर निघालेल्या रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले.
पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते रेझींग डे सप्ताहाचे आज सकाळी उद्घाटन करण्यता आले. या कार्यक्रमात शिवाजी विद्यालय, विवेकानंद विद्यालय, अभ्यंकर महिला विद्यालय, लोकनायक बापूजी अणे आदी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस दलात वापरण्यात येणाºया शस्त्राबाबत माहिती दिली. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक व्यभिचारासह हेल्पलाईन क्रमांक १०९१ बाबत मार्गदर्शन करून महाविद्यालयात तक्रार पेटी सुरू करण्याबाबत प्राचार्यांना सूचना करण्यात आल्या. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वांदीले वडगाव, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 4 = six