रेल्वे अपघातात १८ हजार ७३५ जणांचा मृत्यू

images.jpeg00
नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून रेल्वे ट्रॅकवरील अपघातांतील मृतांचे प्रमाण वाढतच चालले आहे. रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अपघातांबाबत उपाययोजना करुनही अपघातातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  २०११ मध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे १४ हजार ९७३ अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. तर २०१२ मध्ये हेच प्रमाण १६ हजार ३३६ वर पोहोचले. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये १९ हजार ९९७ अपघाती मृत्यू झाले होते. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत रेल्वे ट्रॅकवरील अपघातात सुमारे १८ हजार ७३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बहुतांशी रेल्वे अपघात हे रेल्वे रुळ ओलांडणे, रेल्वेतून खाली पडल्याने, अपघात तसेच आत्महत्या यामुळे होतात. यांसारखे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही गंभीर पावले उचलली जात आहे. रेल्वे रुळ न ओलांडता जिन्यांचा वापर करा यांसारख्या सूचना वारंवार प्रवाशांना केल्या जातात. तसेच विविध प्रवासी जनजागृती कार्यक्रमही रेल्वेकड़ून राबवले जात असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − 4 =