लाचखोर ठाणेदारासह मुख्याध्यापक ‘एसीबी’च्या जाळ््यात

images-2
यवतमाळ, दि. १४ – जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून शनिवारी पाटणचे ठाणेदार व पोलीस नाईकाला तसेच पुसद येथील मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.
पाटण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ठाणेदार शिवाजी भद्दू अहिरे (४३) व पोलीस नाईक सुरेश निब्रड (४५) याने गुन्’ात पकडलेले ट्रॅक्टर सुर्पूतनाम्यावर सोडण्यासाठी तक्रारकर्त्याला १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यांनतर एसीबीच्या पथकाने दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
पुसद येथील वसंतराव नाईक विद्यालयातील मुख्याध्यापक राम दिनकर बल्लाळ (५२) सहाय्यक शिक्षकाच्या वेतनातून दरमहा ३.५ टक्के रक्कम कपात करीत होते. सहा महिन्यापर्यंत रक्कम कपात केल्यानंतर सहाय्यक शिक्षकाने रक्कम कपात करण्यास नकार दिला. यावेळी मुख्याध्यापकाने शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापकाच्या त्रासाला कटांळलेल्या शिक्षकाने त्यांची भेट घेऊन चौकशी केली. यावेळी मुख्याध्यापकाने १६ महिन्याच्या वेतनातील ३.५ टक्केनुसार रक्कम व १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. कोणतेही कारण नसताना, पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापक वेठीस धरत असल्यामुळे सहाय्यक शिक्षकाने एसीबी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर ठरल्यानुसार १४ हजार रुपयाच्या रक्कमेतील पहिला सात हजार रुपयांचा टप्पा देण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापकाच्या कक्षात गेला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पथकाने मुख्याध्यापकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जिल्’ात लाचखोरांची संख्या दिवसंदिवस वाढत असून, पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर असल्याचे आजच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीष देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अमोल महल्ले, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, नीलेश पखाले, प्रकाश शेंडे आदींनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven × = 56