लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ््यात

images (2)
यवतमाळ, दि. ९ – विहिर नसल्याचा दाखला देण्यासाठी शेतकºयाला साडेतीन हजार रुपयांची लाच मागणारा तलाठी आज सोमवारी एसीबीच्या जाळ््यात अडकला. हि घटना केळापूर तहसील कार्यालयात घडली असून, संतोष सुखदेव मराठे (४०) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
केळापूर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाºया किन्हाळा येथे संतोष मराठे तलाठी म्हणून कार्यरत होता. शेतकरी महिलेने शेतात विहिर नसल्याचा दाखला व सातबारा मिळण्याबाबत तलाठ्याकडे अर्ज केला होता. महिलेला दाखला व सातबारा देण्याची गरज असताना, तलाठी महिलेला त्रास देत होता. दरम्यान त्याने दाखला व सातबारा देण्यासाठी महिलेकडे ३ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी महिलेने तालाठ्याला धडा शिकविण्यासाठी लाच देण्यास होकार देऊन लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे कायालय गाठले व तलाठी लाच मागत असल्याबाबतची तक्रार केली. ठरल्यानुसार लाचेची रक्कम देण्यासाठी आज सोमवारी महिला केळापूर येथे आली. तलाठी लाच स्विकारत असताना, सापळा रचून बसलेल्या एसीबीने त्याला रंगेहात पकडले. हि कारवाई पोलीस उपअधिक्षक सतिष देशमूख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, गजानन राठोड, अनिल राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, निलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, भारत चिरडे, किरण खेडकर, अरूण गिरी आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 7 = eight