पांढरकवडा – पाणी पुरवठाचे बिल काढण्यासाठी लाच मागणाºया कनिष्ठ लिपीकाला एक वर्ष शिक्षा ठोठावली. येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांनी आज हा निकाल दिला.
अरविंद झाडे असे शिक्षा झालेल्या कनिष्ठ लिपीकांचे नाव असून ते घाटंजी पंचायत समितीमध्ये कार्यरत होते. घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील इंदुमती जैयस्वाल या महिलेच्या मालकीची विहीर २००३ मध्ये पाणी पुरवठा करण्याठी ग्रामपंचायतने अधिग्रहीत केली होती. विहीरीचे भाड्याचे १५ हजार रुपये बिल काढण्यासाठी जैयस्वाल यांना एक हजाराची लाच या लिपीकाने मांगितली होती. याप्रकरणाची तक्रार जैयस्वाल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या विभागाच्या पथकाने सापळा रचुन घाटंजी येथील श्याम उपहारगृहात लाच घेताना झाडे याना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायदंडाधिकारी पि.एम. हुणेदार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये दोषी आढळल्याने झाडे यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने अॅड. प्रशांत मानकर यांनी काम पाहिले.









