लाचखोर श‌िपायाच्या घरात १० लाखांची रोकड

images (1)
ठाणे – वाहनचालकाचे लायसन्स परत देण्याच्या बदल्यात तेराशे रुपयांची लाच घेणारा व‌िरारच्या वाहतूक शाखेचा श‌िपाई शंकर तनपुरे (३०) याच्या घर झडतीत चक्क १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रत‌िबंधक व‌िभागाच्या पालघरच्या पोल‌िसांनी तनपुरे याला अटक केली होती. तनपुरे यांनी तक्रारदाराकडे वाहनचालक लायसन्स परत देण्याच्या बदल्यात लाच घेतली होती. अटक झाल्यावर त्याच्या घराच्या झडतीत पोल‌िसांना १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळली. ही रोकड त्याने कशी म‌िळवली, याचा पोल‌िस शोध घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + = 9