
यवतमाळ, दि. ११ (प्रतिनिधी) – गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेणाºया पोलीस नाईकास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात ही कार्यवाही केली.
संदीप केशव तिजारे असे पोलीस नाईकाचे नाव असून कळंब पोलीस ठाण्यात नेमणुक आहे. कळंब पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक करणार नाही. लॉकअपमध्ये टाकत नाही तसेच गुन्ह्याची चार्जशिट लवकर दाखल करतो असे म्हणून तक्रारदाराकडून सहा हजार लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून पथकाने आज सापळा रचुन कळंब पोलीस ठाण्यातच लाच घेताना तिजारे याना रंगेहात पकडले. या कार्यवाहीने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.









