लातूरमध्ये भीषण अपघात, सहा ठार

index
लातूर – लातूर जिल्ह्यातील चापोली गावाजवळ बुधवारी ट्रक आणि अॅपे रिक्षादरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.
बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× one = 8