लाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात

kapus lalya
नागपूर – अस्मानी संकटामुळे यावर्षी शेतकरी संकटात सापडला आहे. सुरुवातीला पावसाची झालेली दिरंगाई व त्यानंतर दुबार तिबार पेरणी करून शेतकरी कसाबसा सावरत असताना सोयाबीनवर आलेल्या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीन जाग्यावरच करपली. त्यामुळे शेतकºयांना शेतात राहिलेली थोडीफार सोयाबीन कापणे मजुरीस परवडणारे नव्हते. त्यामुळे ती तशीच शेतातच राहू द्यावी लागली. सोयाबीननंतर मिरचीवर गेलेल्या बोकड्या रोगानेही शेतकºयांना चिंतेत टाकले आहे. तर विदर्भात मोठ्या प्रमाणात घेत असलेल्या कपाशीवर लाल्या रोग गेल्याने होणारे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. यामुळे महत्वाच्या सोयाबीन, मिरची व कपाशीवर रोग गेल्याने विदर्भातील शेतकरी संकटात सापडला आहे.
कपाशीवर नायट्रोजन, पोटॅशियम व मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे लाल्या जातो. तसेच दहिया (ग्रे मिल्ड्यू) या रोगामुळे कपाशीवर लाल्या गेला की कपाशीची वाढ खुंटते व त्यामुळे कपाशीच्या झाडावर असलेले बोंडे पक्व न होताच फुटत असल्याने शेतकºयांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांनी वेळीच लाल्या या रोगाचे नियंत्रण केल्यास अधिक उत्पादन मिळणे शक्य आहे. परंतु शेतकरी व कृषी विभागाची अद्याप नाळच जुळली नसल्याने शेतकºयांना कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाही. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती ठरला आहे. शेतकºयांपर्यंत आधुनिक माहिती व तंत्रज्ञान पोहोचविण्यात प्रशासकीय यंत्रणेचा अभाव असल्याचे सातत्याने दिसून येते. परंतु याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही. सोयाबीन, मिरची व कपाशी तसेच धानावर कीटकनाशकांसोबत अ‍ॅप्सा-८० हे बहुउद्देशीय स्पे्र गुणवर्धक वापरल्याने चांगले परिणाम दिसून आले आहे. कीटकनाशकासोबत अ‍ॅप्साचा उपयोग केल्याने पिकांचे रोेगांपासून परिणामकारक संरक्षण मिळाले आहे. कारंजा घाडगे तालुक्यातील पारडी येथील राजेंद्र चरडे यांच्या शेतातील कपाशी ही अद्याप हिरवीगार असून बाजुच्याच लक्ष्मण टिपले यांच्या शेतातील कपाशीचे पाने लाल्याने सुकले आहेत.
राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे विदर्भातील शेतीवर निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच्या नापिकीने त्यांना शेतात अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करून आधुनिक शेतीचा ते विचारही करू शकत नाही. सिंचनाच्या सुविधा नसल्याने विदर्भातील शेतकºयांना नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे हतबल होत अनेकांना टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करावी लागते. परंतु आता केंद्रातील व राज्यातील सरकार बदलल्याने विदर्भातील शेतकºयांना चांगले दिवस येण्याची आशा आहे. विदर्भातील शेतकरी सुखी व समृद्ध होण्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करण्यासोबतच आधुनिकतेशी शेतीला जुळण्याची गरज आहे. विदर्भातील शेतकरी हजारो वर्षांपासून करीत असलेली शेतीच्या ज्ञानाचा उपयोग करीत अधिक उत्पादन घेण्याचा आटापिटा करीत आहे. पिकांमध्येही फेरफार करणे किंवा विविध प्रयोग करीत आधुनिक शेतीचा विचार करणारे फारच अल्प शेतकरी असल्याने दिवसेंदिवस रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वाढत असलेल्या किंमती व वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने तसेच तरुणाई शेतीत राबण्यास तयार नसल्याने विदर्भातील शेतीच संकटात सापडली आहे. युती सरकार धडक सिंचन कार्यक्रम राबवित असून विदर्भातील ८३,२०० विहिरींच्या बांधकामांचे उद्दिष्ट पार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जवाहर विहीर योजना राबविण्यात येत आहे. परंतु यासाठी प्रशासकीय यंत्रणा कितपत सक्रिय होते, हे बघावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 × six =