यवतमाळ – भांबराजा-हिवरी मार्गावर इंडीगो वाहन अडवून चालकाला चाकुच्या धाक दाखवून मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी ४८ तासात पाच आरोपींना अटक केली.
प्रफुल भगवान येलम (२०), रुपेश नरेश तंटक (२१), आकाश इिलीप शेंडे (२१), मंगेश मारोतराव शिरभाते (२०), अविनाश उर्फ चिमणा वासुदेव अजमिरे (२२) सर्व रा. यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. दुर्गेश आनंद ठाकरे (४२) रा. शिवाजी नगर यवतमाळ हे १३ मार्च रोजी दुपारी इंडीगो कारने आर्णीवरून यवतमाळकडे येत होते. अशातच भांबराजा ते हिवरी रस्त्यात अचानक पाच जणांनी कार अडवून ठाकरेसह एकाला चाकुचा धाक दाखवून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच लुटण्याचा प्रयत्न करून सदर युवक दोन दुचाकीवरुन पसार झाले. यावेळी ठाकरे यांनी एका दुचाकीचा (एम.एच. २९ / एच. ४१८० )क्रमांक पाहिला होता. याप्रकरणी ठाकरे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देऊन सदर क्रमांक नमुद केला. त्यावरून पाचही आरोपीविरुद्घ भादंवि कलम १४७, १४९, ३४१, २९४, ५०६, ४२७, ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करुन दुचाकी कुणाच्या नावाने आहे याबाबत माहिती मांगतली. या कार्यालातून प्राप्त माहितीच्या आधारावरुन पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावुन पाचही आरोपींना अटक केली. ही कारवाई ग्रामीणचे ठाणेदार महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार, जमा. भक्तराज बन्सोड, महेश फुनसे करीत आहे.









