लोकशाही दिनात ७४ तक्रारी

यवतमाळ- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरिकांनी विविध विभागाशी संबंधित ७४ तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यकायर्कारी अधिकारी, तसेच अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी मागील लोकशाही दिनातील ४० तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.आज लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी दाखल झालेल्या ७४ तक्रारीमध्ये महसुल विभागाच्या २३, जिल्हा परिषद २७, पाटबंधारे ६, भुमी अभिलेख ३, वनविभा्ग ३, महाराष्ट्र राज्य विज वितरण २, सहकार २, नगर परिषद १, सार्वजनिक बांधकाम १, जिवन प्राधिकरण १, व इतर विभागाच्या दोन तक्रारींचा समावेश होता. प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश लोकशाही दिनाच्या कामकाज प्रसंगी संबंधित खाते प्रमुखांना देण्यात आले. या लोकशाही दिनाच्या कामकाजास इतर विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 − = three