लोकसभेसाठी आपचे २० उमेदवार जाहीर

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने रविवारी देशातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उमेदवारी दिली आहे. मेधा पाटकर या ईशान्य मुंबईतून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.तसेच वायव्य मुंबईत गुरुदास कामत यांच्या विरोधात मयंक गांधी आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या विरोधात मीरा सन्याल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात अंजली दमानिया, नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्या विरोधात विजय पांढरे आणि पुण्यात सुभाष वारे निवडणूक लढवणार आहेत. अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास, दिल्लीतील चांदनी चौकात कपिल सिब्बल यांच्या विरोधात आशुतोष, गुडगावमधून योगेंद्र यादव, पश्चिम दिल्लीमधून महाबल मिश्रा च्याविरोधात जरनेलसिंग, मैनपुरी येथून मुलायमसिंह यांच्या विरोधात बाबा हरदेव, मुरादाबाद येथून अजहरुद्दीन विरोधात खालिद परवेज, अजि‍त सिंह यांच्या विरोधात सोमेंद्र ढाका, लालगंज येथून जिया लाल, सहारनपुर येथून योगेश दहिया, खंडवा येथे आलोक अग्रवाल, फरुखाबाद येथून पत्रकार मुकुल त्रिपाठी आणि मनीष तिवारी यांच्या विरोधात लुधियाना येथून एच. एस. फुल्‍का यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 36