वकीलावर प्राणघातक हल्ला

download (6)
यवतमाळ, दि. २६ – पैशाच्या वादातून वकीलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गोधणी मार्गावर काल बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुामारास घडली. अ‍ॅड. भरत डी. होरा असे जखमी झालेल्या वकीलाचे नाव असून, वडगावरोड पोलीस प्रकरण दडपण्याच्या हालचाली करीत आहे.
शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. उमरसºयातील युवकाच्या हत्येची घटना ताजीच असताना, पैशाच्या वादातून गोधणी मार्गावर मधू सिघांनिया याने वकिलाला अडवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जखमी झालेल्या वकीलाने वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर लगेच मधू सिंघानिया याने देखील पैशाची मागणी केली असता, मारहाण करून शिविगाळ केल्याची तक्रार वकीलाविरोधात नोंदविली. वकीलाला मारहाण झाल्याचे त्याच्या शरीरावरील इजा वरून व वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले असताना, पोलीस कारवाई करण्यात चालढकल करीत आहे. सिंघानिया दुपारपासूनच वकिलाला मारण्याच्या बेतात होता. तो वकिलाचा शोध घेत गोधणी मार्गावर पोहोचला. यावेळी त्याला अ‍ॅड. होरा दिसताच तो त्यांच्या अंगावर तुटून पडला. दोन जणांनी मध्यस्थी केल्यामुळे वकिलाचे प्राण वाचल्या गेले. वडगावरोड पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे नोंदवून सिंघानियाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− six = 3