वडिलाकडून मुलीवर अत्याचार

rape-sds
ठाणे  , दि. ८ (प्रतिनिधी) – दिवसा शाळेत झोपणाऱ्या सातवीतील विद्यार्थिनीला डॉक्टरांनी तपासणी करतांना त्याबाबत विचारणा केली असता, अखेर आपले वडील रात्री शारीरिक अत्याचार करत असल्याने झोपता येत नाही. त्यामुळे दिवसा झोप येते, अशी धक्कादायक कबुली तिने दिल्यावर डॉक्टर व शिक्षक सर्दच झाले. त्यानंतर तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता असे समजते.
मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात हे कुटुंब राहते. आरोपी एका शाळेत खिचडी बनवण्याचे काम करतो तर, त्याची पत्नी मोलमजुरी करते. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर तिचे वडीलच गेल्या वर्षभरापासून शारीरिक अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे.
सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर व एका खासगी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार पोलिसांना समजला. त्यानंतर चिल्ड्रन प्रोटेक्शन युनिटच्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा मनोरे व नीलम वाकचौरे यांनी या मुलीसह तिच्या आईला धीर दिला. त्यानंतर पिडीत मुलीची आईने केलेल्या तक्रारीनंतर नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती सीनिअर इन्स्पेक्टर मदन बल्लाळ यांनी दिली. आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× six = 48